शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिवसेना युवा सेनेच्या शिरूर लोकसभा (भोसरी आळंदी खेड) अध्यक्षपदी अजिंक्य सुलभा रामभाऊ उबाळे यांची निवड झाली. या निमित्ताने मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार महासंसदरत्न मा.श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तमाम शिवसैनिक उपस्थित होते.
या नव्या नेमणुकीच्या निमित्ताने मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार व महासंसदरत्न मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांनी अजिंक्य उबाळे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, “युवा सेनेतील ही नवीन नियुक्ती पक्षाची ध्येयधोरणे अधिक बळकट करेल आणि तरुणाईत शिवसेनेची ऊर्जा आणखी वृद्धिंगत होईल.”
या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात सर्वांनी नविन नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.