- भाजपचे जयदीप खापरे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण परिसरात भाजपचे मंडलाध्यक्ष जयदीप खापरे यांच्या संकल्पनेतून 300 झाडे लावण्याचा संकल्प आज पूर्ण झाला आहे.
निगडी प्राधिकरण येथील ट्रान्सपोर्ट नगरी येथे सूर्यमुखी मंदिराच्या उद्यानामध्ये “नक्षत्र बाग” नावाने वृक्षारोपण करण्यात आले, प्रत्येक रोपाला नक्षत्रांची नावे देण्यात आली हा आगळावेगळा उपक्रम जयदीप खापरे व हनुमान मंदिर ट्रस्ट व विप्र कंपनीचे पदाधिकारी तसेच प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जयदीप खापरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तीनशे झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला व या संकल्पनेतूनच “नक्षत्र बाग”ची संकल्पना उद्यासाठी व आज सत्यात उतरली.
या आगळ्यावेगळ्या वृक्षारोपण कार्यक्रमास विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळीक, हास्य क्लब प्राधिकरणाचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी माजी उपमहापौर शाईजा मोरे माजी उपमहापौर तुषार हिंगे माजी नगरसेविका शर्मिला बाबर माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे माजी नगरसेवक माऊली थोरात भाजपचे सरचिटणीस संजय मनगुडेकर देविदास पाटील गणेश ढाकणे विजय सिनकर राधिका बोरलीकर तसेच विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गौंड हनुमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद भावसार असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणेचे अध्यक्ष तथा निगडी खंडोबा ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर सोमनाथ काळभोर सुशांत मोहिते यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला सर्व उपस्थितांचे जयदीप खापरे यांनी आभार व्यक्त केले.