spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’ची तुषारा थुम्मलापल्ली भारतीय नौसेनेत पायलट

शबनम न्यूज | पुणे

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातून 2024 मध्ये पदवी प्राप्त केलेल्या तुषारा थुम्मलापल्ली यांनी भारतीय नौसेनेत पायलट म्हणून गौरवशाली नियुक्ती मिळवली आहे. हा क्षण विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाचा असून, देशभरातील तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

फक्त 23 वर्षांच्या वयात तुषारा यांनी नौदलाच्या विशेष पायलट गटात स्थान मिळवले आहे. अभियंता ते सैन्य अधिकारी असा त्यांचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता, निर्धार आणि राष्ट्रसेवेच्या प्रति कटिबद्धतेचे प्रतीक आहे. यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनुसार, तुषारा यांनी शिक्षण काळात नेहमीच उत्कृष्ट शैक्षणिक आणि नेतृत्वगुण दाखवले. तांत्रिक प्रकल्पांमध्ये आणि विभागीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. “पहिल्याच दिवशीपासून तुषारामध्ये अधिकारी म्हणून लागणारे शिस्तप्रियता, चिकाटी आणि प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती. भारतीय नौसेनेत तिच्या या नव्या प्रवासास सुरुवात होत असताना, तिची प्रेरणादायी कहाणी विशेषतः तरुण विद्यार्थिनींना संरक्षण आणि वैमानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देईल”, असे यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी म्हटले आहे.

तुषाराच्या या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विभागाचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!