शबनम न्यूज :
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सौ. सोनाली ताई संदीप गाडे यांच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय गुणसंपादन केले आहेत अशा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
थेरगाव परिसरातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक स्वीकृत सदस्य संदीप काशिनाथ गाडे यांचे जनसंपर्क कार्यालय, पवार नगर, कॉलनी क्रमांक एक थेरगाव या ठिकाणी जमा करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक जमा करण्यासाठी 90 67 61 0101 व 99 21 47 0101 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे असे हि आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक गुरुवार दिनांक 10 जून पर्यंत जमा करावे.