spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धेत ‘आर्यन्स मार्शल आर्ट्स’ संस्थेचे खेळाडू चमकले

  • ११ सुवर्ण, ५ रौप्य पदकांची कमाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उज्वल कामगिरी केली. यामध्ये पिंपरी-चिंचवडतील संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन करत ११ सुवर्ण व ५ रौप्य पदकांची कमाई केली.

सुवर्ण पदक विजेते:
अजिंक्य आडसूळ, इंद्राणील सावंत, मयांक कदम, मल्हार म्हात्रे, यद्नेश पोल, संस्कार जाधव, शितल माळगे, आरोही सपार, आराध्य पायगुडे, चिन्मय सोनवणे, नव्या वाघमारे.

रौप्य पदक विजेते:
शरयू म्हात्रे, मनीष म्हात्रे, रोहण म्हात्रे, काव्या पोल, सायली घोडके.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक आदित्य शिरसाठ सर, आदित्य अडागळे सर आणि संस्थेचे संस्थापक संतोष म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेचे अध्यक्ष सागर रेवाळे यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!