सौ. दगडे, सौ. राऊत यांना पुरस्कार प्रदान
पिंपरी (प्रतिनिधी) चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कौटुंबिक स्नेह मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
यंदाच्या संमेलनामध्ये उद्योजक संघटनेने दोन महिला उद्योजकांना पुरस्कार आणि दहावी -बारातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
एस्टेरॉईड क्रशिंग ॲंड स्क्रीनिंग प्रा लि.च्या संचालिका शकुंतला दगडे व एस बी आर मशीन्स प्रा लि च्या संचालिका प्राजक्ता राऊत यांना उत्कृष्ट महिला उद्योजिका 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आजकाल महिला केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या आहे. उद्योग व्यवसायात महिलांचे देखील मोठे श्रम व त्याग असतो. असे उदगार अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी काढले .
हे स्नेह संमेलन चिंचवड मध्ये पार पडले. या कौटुंबिक स्नेह संमेलनामध्ये शेकडो उद्योजक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत सहभागी झाले होते. चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी संपूर्ण संघटनेच्या कार्याचा व नंतर उद्योजिका संघटना प्रमुख पौर्णिमा शिंदे यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये उद्योजिका समूहाने राबविलेल्या सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचा आढावा घेतला.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व संचालक प्रवीण शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी शेवटी आभार मानले.