मोशीतील गोकुळधाम सोसायटीमधील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपये किमतीचे सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. ही घटना २३ मेच्या रात्री ते २४ मेच्या दुपारपर्यंतच्या कालावधीत घडली.
या प्रकरणी विजय बळवंत बर्गे (३८) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळधाम सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे शशि भूषण पांडे यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटातून दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.