spot_img
spot_img
spot_img

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात महानगर पालिका निवडणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सांगली येथे संपन्न झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील तसेच जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होतील त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांनी ताकदीने ने काम करावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे.

तसेच महानगरपालिका निवडणुकीत जो उमेदवार जिंकून येईल अशाच उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!