शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून राज्यभरात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना यलो तर काहींना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे शेती, आरोग्य आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट? :
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली.या जिल्ह्याना यल्लो अलर्ट देण्यात आला
तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यना ऑरेंज अलर्ट देण्यात आल
प्रमुख शहरांतील हवामान अंदाज :
मुंबई चे किमान तापमान 26°C, कमाल तापमान 32°C. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता.
पुणे चे किमान तापमान 22°C, कमाल तापमान 31°C. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज.
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
राज्यात 20 मे नंतरचे काही दिवस हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. प्रशासनाने पावसामुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.