spot_img
spot_img
spot_img

बांधकाम व्यावसायिकाकडून पाच कोटीची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडून मंजूर परवानगीपेक्षा अधिक मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी असल्याचे दाखवून ग्राहकांकडून पाच कोटी ३७ लाख रुपये घेत कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर येथे हा प्रकार घडला.

निखिल ज्ञानेश्वर फालक (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बांधकाम प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून चार मजल्यांची परवानगी घेतली आहे. तसेच दुसऱ्या एका प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाच मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली आहे. असे असताना त्यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती न देता ग्राहकांना दहा मजल्यापर्यंत परवानगी प्राप्त करण्यात येत असल्याची खोटी माहिती दिली.

प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम पूर्ण न करता फालक आणि इतर ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परत न करता तसेच गुंतवणूकदार यांच्याशी कोणताही रजिस्टर नोंदणी विक्री करार न करता रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!