शबनम न्यूज | प्रतिनिधी
वैष्णवी सोबत घडलेल्या घटना ही अमानवी आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींना काही तासात जेरबंद करतील. पुढारी आहे म्हणून मला सर्व काही करण्याची मुभा आहे. ही वृत्ती पोलीस मोडून काढतील. असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. सामंत यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं.
यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे, मोहन कस्पटे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक कोल्हटकर उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे. पोलीस काही तासात आरोपींना अटक करतील. वैष्णवीसोबत अमानुष घटना घडली आहे. आरोपींच्या शोधासाठी सहा पथक रवाना करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची भूमिका आहे. पुन्हा कुणी अस धाडस करणार नाही. अशी शिक्षा आरोपींना दिली जाईल.सुदैवाने दहा महिन्याच बाळ सुखरूप आजी-आजोबांकडे आलं आहे. अशा गोष्टींचा समाजावर परिणाम होतो. या कुटुंबावर आघात झाला आहे. अशी घटना पुन्हा होणार नाही. यासाठी पोलीस काळजी घेतील. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला म्हणजे अस करण्याचं सर्टिफिकेट दिलेलं नाही. पुढारी असला म्हणजे अशी करण्याची मुभा नाही. हे सगळं आता पोलीस मोडीत काढतील.