- महाराष्ट्र राज्य सरकार वतीने विशेष अभय योजना लागू
शबनम न्यूज | पिंपरी
भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने सिंधी समाज स्थापित झाले, आता सिंधी समाजाला आपल्या जमिनी संदर्भात मालकी हक्क प्रदान होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष अभय योजना २०२५ लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना अशा परिवारांसाठी आहे, ज्यांच्या जमिनी अनेक दशकापासून महाराष्ट्र राज्यात नियमित करण्यात आल्या नाहीत, राज्य शासनाच्या या योजनेचा मुख्य उद्देश सामाजिकदृष्ट्या आत्मनिर्भरता निर्माण करण्यावर आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या अभय योजनेचा लाभ घेता येईल.
पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी शासनाचे आभार व्यक्त करताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात तसेच महाराष्ट्रात अनेक भागात सिंधी समाज अनेक वर्षापासून राहत आहे. सिंधी समाजाच्या वतीने अनेक वर्षापासून या निर्णयाची मागणी होत होती. पिंपरी कॅम्प मध्ये राहणारे अडीचशे ते तीनशे परिवारांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ही अभय योजना सिंधी समाजाला सन्मान आणि सुरक्षा देणारे प्रतीक ठरले आहे, या योजनेमुळे सिंधी समाजाला खऱ्या प्रमाणात न्याय मिळाला आहे, असे हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.