spot_img
spot_img
spot_img

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक – शत्रुघ्न काटे

शबनम न्यूज | पिंपरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेता यावी, यासाठी दिनांक २१ ते ३१ मे २०२५ या कालावधीत अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे आज, बुधवार रोजी कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, कार्यशाळेच्या वक्त्या कीर्तनकार शारदाताई मुंडे, संयोजक शितल शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले; “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे कार्य हे समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम जनतेला त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतील आणि युवा पिढीला प्रेरणा देतील. भाजपच्या वतीने आम्ही त्यांच्या आदर्शांना वंदन करतो आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

माजी आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की; “अहिल्यादेवी होळकर या स्त्रीशक्तीचे ज्वलंत उदाहरण आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी मोठे योगदान दिले. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ देतील. मला विश्वास आहे की, या कार्यक्रमांमधून अनेक महिला त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतील.”

माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या की; “अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ राज्याचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा लौकिक वाढवला. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन आजही अनुकरणीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन करून आम्ही त्यांच्या विचारांना आणि कार्याला पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कार्यक्रम युवकांना इतिहासाची जाणीव करून देण्यास मदत करतील.”

कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या शारदा ताई मुंडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की; “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म, संस्कृती आणि समाज यांच्या संवर्धनासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित हे विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक समृद्ध करतील. भाजप महाराष्ट्राच्या वतीने आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की, हे कार्यक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता, त्यातून समाजोपयोगी संदेश जनतेपर्यंत पोहोचावा.”

कार्यक्रमाचे संयोजक शीतल शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपाच्या वतीने शहरात विविध गुणात्मक आणि संख्यात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरातील 14 मंडल निहाय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये घाट पूजन, मंदिरे पूजन, साफसफाई स्वच्छता अभियान, चित्ररथ, नाटक, शोभायात्रा, प्रदर्शनी भरवणे, स्टिकर तयार करणे, बुक पुस्तक वाटप करणे, प्रभावि महिला व युवा मेळावे घेणे इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी कार्यकर्ते, वक्ते आणि संयोजक यांची नेमणूक करण्यात येणार असून, 21 ते 31 तारखेपर्यंत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासोबतच, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल. पत्रकार आणि बुद्धीजीवी यांच्यासोबत चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल. शैक्षणिक संस्थांमध्ये परिसंवादाचे कार्यक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर लेख प्रकाशित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेला दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माउली थोरात, महेश कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, धनराज बिरदा, जयंती महोत्सवाचे संयोजक शीतल शिंदे, सरचिटणीस अजय पाताडे, शैला मोळक, माजी नगरसेवक केशव घोळवे, सुरेश भोईर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, मनोज ब्राह्मणकर, माधुरी कुलकर्णी, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, बिभीषण चौधरी, गणेश ढोरे, हर्शल नढे, मोहन राऊत, अजित बुर्डे, शिवराज लांडगे, योगेश सोनावणे, मंगेश धाडगे, रामदास कुटे, धरम वाघमारे, संजय पटनी, समीर जावळकर, नंदकुमार भोगले, विजय शिनकर, दत्तात्रय ढगे, मधुकर बच्चे, मनीषा शिंदे, मनीषा पवार, प्रेरणा चंदाणी, जयश्री मकवाना, कोमल गौंडाडकर, दिपाली केंगारे, सीमा चव्हाण, सुरेश तावरे, सुर्यकांत गोफणे, पोपट हजारे, महादेव कवितके, देविदास साबळे, नामदेव पवार, गणेश ढाकणे, गोरक्षनाथ झोळ, खंडूदेव कठारे, प्रदीप बेंद्रे, सुर्यकांत खंडागळे, मनोजकुमार मारकड, उमेश पवार, विठ्ठल कराळे, दिनेश पाते, रावजी परब, विनोद पाटील, सोपान पाटील, गोरख कुंभार, प्रशांत भागवत, परेश नरुटे, कृष्णा भंडलकर, नेताजी शिंदे, दशरथ शिंदे, संदेश शिंदे, रमेश काळे, पवन ततार, अविनाश गावडे, गणेश लंगोटे, शुभम पिंपळे, राजू ईश्वरकट्टी, रवींद्र पाटोळे, गणेश लोखरे, अशोक केदार, योगेश आकुलवार, दिनेश यादव, गोरख पाटील, अमेय देशपांडे, अजित कुलथे, विशाल डोंगरे, दीपक भंडारी, महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत शिंदे, मेहुल जोशी, संभाजी नाईकनवरे, गोरख पाटील, संकेत चोंधे, नंदू कदम, सचिन राऊत, हनुमंत लांडगे, रुपाली वाघेरे, रत्नमाला देवमाने, रेणुका हेगडे, रोहन देशपांडे, संजय परळीकर, अतुल पवार, सज्जाद तांबोळी, सचिन सरक आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेचे प्रास्ताविक राजू दुर्गे यांनी केले. सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी तर आभार शैला मोळक यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!