शबनम न्यूज | भोसरी
भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक परिसरात आज फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
टी ब्लॉक परिसरामध्ये हा मोठ्या प्रमाणात खड्डा निर्माण झालेला असून काही दिवसापूर्वीच पालिके तर्फे येथे काम करण्यात आलेले आहे परंतु काही दिवसातच या ठिकाणी मोठ्या स्वरूपात खड्डा निर्माण झाल्यामुळे रात्री अपरात्री या भागातून अनेक कामगार वर्ग प्रवास करत असतात अवजड वाहने जात असतात आणि गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले अनेकांना यामुळे दुखापत झाली असून सदर खड्डा महानगरपालिकेने त्वरित बुजवावा यासाठी आज खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर उपाध्यक्ष, वैभव जगताप उद्योजक, प्रसाद खुळे, अशोक मोहिते ,सुखदेव गव्हाणे,निरंजन मनवर, दुर्गा भोर, स्वाती उबळे, यसीन शेख आणि सभोवतालच्या परिसरातील कामगार वर्ग उपस्थित होता.