शबनम न्यूज | पिंपरी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या 300 व्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्याबाबतची अत्यंत महत्वाची बैठक सोमवार दि. 19 मे 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीसाठी महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक साहेब, जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा विणाताई सोनवलकर, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे प्रमुख सदस्य अशोक खरात, धनंजय ताणले, महावीर काळे सर, गणेश खरात, सचिन सरक, रेखाताई दूधभाते, पल्लवीताई मारकड, पोपट हजारे, विठ्ठल देवकाते आदी उपस्थित होते.
उपयुक्त अण्णा बोदडे यांना जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जयंती महोत्सव कार्यक्रम हा 6 दिवसांचा साजरा करण्याचे पत्र देण्यात आले. याच प्रमाणे 31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्या मातेची सकाळी 8 ते 11 या वेळेत खंडोबा मंदिर आकुर्डी ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक पिंपरी या मार्गावरून मिरवणूक देखील काढण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.
या नुसार सोमवार दिनांक 26 मे 2025 ते शनिवार दिनांक 31 मे 2025 पर्यंत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने अत्यंत थाटामाटात साजरी केली जाणार आहे.