spot_img
spot_img
spot_img

भूमि अभिलेख विभागाच्या कामकाजात सूसुत्रता!

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
– ग्रामीण हद्दीतील गावे शहरी नगर भूमापनला जोडणार!

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी पुणे ग्रामीण हद्दीतील काही गावे शहरी नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील भूमि अभिलेख संदर्भातील कामकाजात गतीमानता आणि सूसुत्रता येणार आहे.

विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून भूमापन व भूमिअभिलेख कार्यालयाची सूसुत्रता करावी, अशी मागणी प्रलंबित होती. त्याला आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील ग्रामीण हद्दीतील  गावे नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न करावी करावीत, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुंबई येथील विधीमंडळ अधिवेशन दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि जमाबंदी आयुक्त यांना सात दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त करुन शासन निर्णय निर्गमित केले करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, भूमि अभिलेख हवेली कार्यालयात क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी येत होती. मागील काही कालावधीमध्ये काही गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न केलेली आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील उर्वरित गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून, सदर गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली होती. त्याला यश मिळाले आहे.

शहरातील बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालय क्षेत्राचा विस्तार…
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दीत हवेली तालुक्यातील एकूण 30 गावे आणि मुळशी तालुक्यातील 3 गावांचा समावेश नगर भूमापन अधिकारी कार्यालयाअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यापैकी 12 गावांचे पूर्ण क्षेत्र आणि किवळे, रावेत, मोशी, चिखली, देहू, तळवडे या 6 गावांतील अंशत: क्षेत्र व मुळशी तालुक्यातील वाकड असे एकूण 7 गावांतील अंशत: क्षेत्राचा समावेश आहे. यापैकी 11 गावांचा पूर्णत: समावेश करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनाच्या स्तरावर अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्ड या कामासाठी हवेली भूमीलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांची पायपीट होऊन आर्थिक वेळेचे नुकसान होते सर्वाना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरिता सोयीचे होईल. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे जमाबंदी आयुक्त यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मंत्रीमहोदय यांचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!