पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदेश व नगररचना योजना अधिनियम अंतर्गत करण्यात येणाऱ्या चर्होलीतील प्रस्तावित टी पी स्कीमला चऱ्होली ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
याबाबत ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे सदर निवेदन चऱ्होली ग्रामस्थ वतीने उद्या म्हणजेच शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 वाजता संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हेही उपस्थित असणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
निवेदन देण्यापूर्वी वाघेश्वर महाराज भक्त निवास ट्रस्ट, वेताळ बुवा चौक, चऱ्होली या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने टीपी स्कीम ला विरोध करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहे.
तरी सर्व ग्रामस्थांनीसर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.