spot_img
spot_img
spot_img

चाकण परिसरात कामगार महिलेवर बलात्कार

चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे मंगळवारी 13 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगार महिलेला तोंड दाबून,निर्जन स्थळी नेण्यात आले व तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीमध्ये रात्रपाळी च्या कामासाठी कंपनीमध्ये जात असताना आरोपींनी सदर महिलेला रस्त्यात अडवून जबरदस्तीने तिचे तोंड दाबून तिला निर्जन स्थळी नेवून बलात्कार केला.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला ताब्यात घेतले आहे.

महिलेने आरडा ओरड केली, आरोपीच्या हाताला चावा घेतला यात आरोपी पळून गेला आरोपी पळून गेल्यानंतर सदर महिलेने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला माहिती दिली , सदर महिलेला त्वरित वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार गुन्हा शाखेचे स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले .चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!