spot_img
spot_img
spot_img

महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम राबविणाऱ्या कीज हॉटेलचा सत्कार

शबनम न्यूज | पिंपरी

कचरा व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असून, स्वच्छतेबरोबरच होम कम्पोस्टिंग करणे तसेच रीड्युज, रीयुज व रिसायकल या पद्धतीचा अवलंब करून आपण निर्माण होणाऱ्या प्लास्टिक तसेच घरगुती कचऱ्याचे प्रमाण कमी करू शकतो.
पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा वापर करणे जैविकतेसाठी घातकच आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका दैनंदिन स्वच्छतेबरोबर प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड तसेच झिरो वेस्ट शहर याविषयी जनजागृती मोहीम राबवत असून, हॉटेल तसेच उपहारगृह तसेच भोजनालये इत्यादी ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे परंतु त्याला अपवाद ठरले ते मोरवाडी येथील किज हॉटेल.

निर्माण होणाऱ्या ओल्या तसेच सुक्या कचऱ्याचे उत्कृष्ट पद्तीचे व्यवस्थापन केल्यामुळे महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १० मोरवाडी, पिंपरी येथील किज हॉटेलच्या अस्थापनेचा कौतुक-सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

मोरवाडी येथील ‘किज हॉटेल’ हे झिरो वेस्ट संकल्पना राबविणारे महापालिका परिक्षेत्रातील पहिले हॉटेल ठरले आहे.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जात नाही तसेच कचरा महापालिकेच्या घंटागाडीला न देता ओला कचऱ्यावर प्रक्रिया करुन कंपोष्ट खत बनवले जाते.

“शून्य कचरा” ही प्रक्रिया राबविणारे ते पहिले स्वयंपूर्ण हॉटेल ठरले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभाग राबवत असलेल्या शून्य कचरा मोहिमेस नागरिकांकडून तसेच उद्योग जगताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्त्तात्रय गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे यांच्याकडून कीज हॉटेलच्या आस्थपनेचे उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन केल्याने प्रशस्तीपत्र देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभा प्रसंगी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच कीज हॉटेल आस्थापनेचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा’ मोहिमेस नागरिकांकडून तसेच उद्योग जगताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, अधिकाअधिक नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेस सहकार्य करावे

-विजयकुमार खोराटे
अतिरिक्त आयुक्त,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

आरोग्य विभागाने राबविलेला शून्य कचरा जनजागृती उपक्रम अतिशय स्तुत्य असून, नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे बाकीच्या उद्योगांकडून असाच सकारात्मक प्रतिसाद मिळावा.

सचिन पवार
उप आयुक्त, आरोग्य विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!