spot_img
spot_img
spot_img

MAVAL : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

सांगुर्डी,  – इंदोरी ते सांगुर्डी या मुख्य रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडले. मावळ व खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार शेळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे PMRDAच्या माध्यमातून ₹ ७.६४ कोटींचा निधी मंजूर होऊन कामाला गती मिळाली आहे.

हा रस्ता तयार झाल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सांगुर्डी व इंदोरी गावांमध्ये सुरक्षित, सुगम आणि सक्षम दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे.

कार्यक्रमात मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, PMRDA सदस्य वसंत भसे, उमेश बोडके, प्रकाश हगवणे, सरपंच संगीताताई भसे, सरपंच शशिकांत शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार शेळके यांनी या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

शांताई रेसिडेन्सीमध्ये विकास कामांचे भूमिपूजन

शांताई रेसिडेन्सी को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ता डांबरीकरण व सीमाभिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पार पडले. सोसायटीतील पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.

या कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोष दाभाडे, सुरेश दाभाडे तसेच संजय बाविस्कर, राजश्री कुलकर्णी, सुधीर सपाटे यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शेळके यांनी आपल्या भाषणात, “मावळ परिसरात नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देत असून, सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच काम सुरू आहे,” असे सांगितले.

मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटत असलेल्या आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारामुळे दोन्ही कामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!