spot_img
spot_img
spot_img

७० वर्षानंतर नागरिकांना मोदी सरकारने न्याय दिला – आ.उमा खापरे

जातीनिहाय जनगणना निर्णयाचे चे पिंपरी चिंचवड मध्ये स्वागत

जातीनिहाय जनगणना होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले, 70 वर्षानंतर भारतीयांना मोदी सरकारने न्याय दिला अश्या भावना पिंपरी चिंचवड मधील विधान परिषदेच्या सदस्य आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे चिंचवड प्राधिकरण मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच आनंद व्यक्त करण्यात आला. या निमित्ताने चिंचवड प्राधिकरण मंडळ अध्यक्ष जयदीप खापरे यांनी आनंद उत्सव कार्यक्रम आयोजित केला. यावेळी उमा खापरे बोलत होत्या.

१ मे २०२५ रोजी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. देशामध्ये १९३१ साली इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली होती .त्यानंतर प्रथमच मोदी सरकारने निर्णय घेतला ज्या काँग्रेसला ७० वर्षांमध्ये जमले नाही त्यांनी चुकीचे म्हणणे सांगून दिशाभूल करू नये. जातीनिहाय जनगणना केल्या छोट्या व शोषित विकास बाजूला पडलेल्या समाजाचा विकास होईल. त्यामुळे देशाची प्रगती होईल त्या समाजाच्या लोकसंख्येच्या विकास होईल. त्याबद्दल मोदी सरकारचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
ऍड. वर्षा डहाळे, आ. अमित गोरखे , सदाशिव खाडे, केशव घोळवे, अनुराधा गोरखे ,मोरेश्वर शेडगे, सतीश नागरगोजे, राहुल खाडे संदेश गादिया ,आशा काळे निता कुशारे ,गीता महेन्दु इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!