spot_img
spot_img
spot_img

कुदळवाडी ग्रामस्थांकडुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचा सन्मान

शबनम न्यूज | चिखली

चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांना आपल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आल्याबद्दल स्वी सदस्य दिनेश यादव व ग्रामस्थ यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पोलिस प्रशासन आणि नागरिक यांचा प्रभावी साधत साहेबांनी नेहमीच नागरिकांना तत्पर सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आमच्या सामाजिक कार्यातील मार्गदर्शक तथा चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंखे साहेब यांना पोलीस महासंचालक राष्ट्रीय शौर्य पदक जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील उत्कृष्ट सेवा वजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. यंदा राज्यातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड झाली असून, यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या यशामुळे शहराचा गौरव वृद्धिंगत झाला आहे.

पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, देवेंद्र चव्हाण,आणि सुहास आव्हाड यांच्यासह हवालदार विकास राठोड आणि नितीन ढोरजे यांना महासंचालक पदकासाठी गौरवण्यात आले आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुन्हे उकलण्यात, गुप्त माहिती संकलनात, तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!