शबनम न्यूज | पिंपरी
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात दि 26 एप्रिल व 27 एप्रिल या दिवशी ‘गांव /वस्ती संपर्क अभियान’ राबविण्याच्या बाबत पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या याप्रसंगी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चल वस्ती चलो संपर्क अभियान राबविण्यात आला असून दापोडी फुगेवाडी कुंदन नगर सिद्धार्थ नगर संजय नगर गणेश नगर सुंदर बाग कॉलनी, एसटी वर्कशॉप, या भागामध्ये प्रामुख्याने या अभियान राबविण्यात आले.
यावेळी स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले तसेच मतदार संघातील नागरिकांसोबत मन की बात कार्यक्रम पाहिला असून संपर्क अभियान अंतर्गत परिसरातील विठ्ठल मंदिर परिसरातील स्वच्छता केली प्रभागातील लाभार्थी नागरिकांची घरोघरी जाऊन भेट घेतली तसेच प्रभागांमध्ये राहत असलेले कारसेवक श्री नंदकिशोर कणसे, श्री महेश शांताराम दाभोळकर, श्री दत्तात्रय गायकवाड, श्री शशिकांत देशपांडे, श्री दादासाहेब ढवाण, श्री जनाभाऊ पेडणेकर, व आणीबाणीतील श्री सुभाष बोधे,या सर्व नागरिकांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचा सन्मान केला. तसेच प्रभागातील लाभार्थी संध्या जिजाऊ पवार व इतर नागरिकांच्या घरी भेट दिली.
तसेच प्रभागात पदयात्रा देखील काढली व प्रभागातील प्रमुख व्यक्तींची संवाद देखील साधला यावेळी माझ्यासोबत श्री संजय कणसे श्री धर्मेंद्र क्षीरसागर श्री विशाल वाळुंजकर श्री सागर फुगे श्री रघुनाथ जवळकर सौ दीपाली कणसे श्री शशिकांत देशपांडे श्री राजु कानाडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.