शबनम न्यूज | पिंपरी
कस्तुरी राईज फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त साहित्य सांस्कृतिक कार्यक्रम व मराठी रत्न गुणगौरव सन्मान सोहळा गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती कस्तुरी राईज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया मानमोडे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, माजी गटनेते एकनाथ पवार, नगरपरिषद प्रशासन संचालक, नवी मुंबई महा. चे सहआयुक्त उमेश कोठीकर, मा. सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक राजू मिसाळ, निर्माता आणि दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते, प्रकाश दिंडले शैलाजाताई मोरे, जितेंद्र देसले, संतोष शेठ, सिताराम बारणे, शिरीष राणे, रिमा रंजन, पराग अहिरे, देव झुंबरे, अमित गावडे, नितीन धावणे पाटील, नारायण साहेबराव बडगुजर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गुण गौरव सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातून रिमा रंजन, सिने कला क्षेत्रातून चंद्रकांत विसपुते,कलाक्षेत्रातून प्रकाश दिंडले, कलाक्षेत्रातून गिरीश राणे, उद्योजक क्षेत्रातून पराग सुभाष अहिरे ,सिने कला क्षेत्रातून देव झुंबरे, पत्रकारिता क्षेत्रातून नारायण साहेबराव बडगुजर, उद्योजक क्षेत्रातून नितीन धवणे पाटील, पत्रकारिता क्षेत्रातून शबनम सय्यद, कला क्षेत्रातून प्रशांत गेडाम, सामाजिक क्षेत्रातून राजाभाऊ बनसोडे, वैद्यकीय क्षेत्रातून अनिल बिहाडे, साहित्य क्षेत्रातून जितेंद्र देसले, सामाजिक क्षेत्रातून ब्रम्हांड सेवा संवर्धन फाउंडेशन, सामाजिक क्षेत्रातून गर्व सामाजिक संस्था ,उद्धाश्रम वास्तुकाला क्षेत्रातून आदित्य बर्वे, योग कला क्षेत्रातून प्रवीण माळी, योग कलाक्षेत्रातून अशोक ठाकरे, शिवकालीन वृद्ध कला क्षेत्रातून सुरेखा शिरसागर, नृत्यकला क्षेत्रातून उन्नती शिरसाठ ,शैक्षणिक क्षेत्रातून सुमय्या पठाण, सामाजिक क्षेत्रातून ज्योती सूर्यवंशी, कामगार क्षेत्रातून दुर्गेश पाटील, उद्योजक क्षेत्रातून वर्षाराणी मुळे, उद्योजक क्षेत्रातून वंदना रांगळीकर, सामाजिक कार्यक्षेत्रातून मीरा बोस, उद्योजक क्षेत्रातून योगिता इकडे, सौंदर्य क्षेत्रातून प्रगती नाईक, उद्योजक क्षेत्रातून वाल्मीक सोनवणे, अभिनय कला क्षेत्रातून सोमनाथ स्वभावणे, सामाजिक क्षेत्रातील सुरेश तकटे, शैक्षणिक क्षेत्रातून अश्विनी बाविस्कर ,पारंपारिक फेटा कलाक्षेत्रातून विकास गोविंद राऊत, सामाजिक क्षेत्रातून रंजनाताई नवले ,वास्तुकाला क्षेत्रातून अनिता भगत,उद्योजक क्षेत्रातून वैशाली अहिरे, क्रीडा क्षेत्रातून प्रणव गायकवाड, व्यावसायिक क्षेत्रातून समृद्धी मोरे ,वस्त्र कला शस्त्रातून रश्मी सिंह, शैक्षणिक क्षेत्रातून राहुल लोंढे ,सविता मलिकार्जुन या सर्व पुरस्कार्थींचा गुणगौरव सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक हर्षदा गायकवाड, कोमल कदम, रोहन देसाई, वैभव भालेराव, सोनाली कोदे, दिपाली सोनवणे, छाया भदाणे, सुषमा कोळेकर, सौरव पंडित आहेत. सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया सुरेश मानमोडे यांनी केले आहे.