spot_img
spot_img
spot_img

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंचच्या वतीने निदर्शने

शबनम न्यूज | पुणे

पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक हिंदू बंधवांना गोळ्या घालून ठार केले गेले. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम यांच्या पुढाकाराने प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंच च्या वतीने कमला नेहरू पार्क, प्रभात रस्ता येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

काश्मीर, पहलगाम येथिल हिंदु पर्यटकांवरील इस्लामी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि पाक लष्कर प्रमुख असिम मुनीर व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करुन त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आले.

या मध्ये महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. आणि स्त्री शक्तीचे संगठन दिसून आले. केतकी देशपांडे, सुवर्णा ऋषि, रंजना नाईक, किमया ढेकणे ,अलका पेशवे ,भक्ती साठे ,माधवी अगरवाल, अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिराम ,विवेक देव,हर्षल मोरे,योगेश जोगळेकर अजिंक्य मेहता, प्रदीप देशपांडे, मिलिंद टकले, पुष्कर लिमये तसेच कामाला नेहरू पार्क मधील नागरिकांचा सहभाग दिसून आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!