शबनम न्यूज | पुणे
हातामध्ये तलवारी घेऊन दहशत माजवत टोळक्याने दुचाकींची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना सोमवारी रात्री पाषाण भागातील संजयनगर परिसरात घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
साहिल नागेश कसबे (वय १८), असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार आदित्य जगन्नाथ मानवतकर, ओंकार रतन मानवतकर, मंगेश जाधव हे फरार आहेत. याबाबत चेतन शेषराव धान (२६, रा. संजयनगर, पाषाण) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल कसबे, मानवतकर, जाधव यांचा संजयनगर परिसरातील काही जणांशी वाद झाला होता. संजयनगर परिसरातील रहिवासी सोमवारी झोपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मानवतकर, कसबे, जाधव तलवारी घेऊन वसाहतीत शिरले. त्यांनी तलवारी उगारून परिसरात दहशत माजविली.