spot_img
spot_img
spot_img

२५ जानेवारीला जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त पंकज पाटील, ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये योगसाधना, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य तसेच शिस्तबद्ध जीवनशैलीचा संस्कार रुजवणे या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील व खासगी शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, तसेच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अशी करता येणार नावनोंदणी…. 

या जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवासाठी नावनोंदणी २२ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे दररोज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत करता येणार आहे. तसेच ९४२२२३१५६९ या व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल क्रमांकावर देखील नावनोंदणी करता येईल. नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मैदानावर केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे सकाळी ७.३० वाजता मुख्य सूर्यनमस्कार महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!