शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या प्रचार उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जय तुळजा भवानी वॉकिंग ग्रुप व जायका चहा कट्टा, भोसरी यांच्या वतीने या मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. शीतल बाग ते सीएमई रस्ता या मार्गावर सकाळी नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मॉर्निंग वॉकमध्ये प्रकाश भडकुंबे, निवृत्ती फुगे, चंद्रकांत गोरे, अशोक बिचकुले, विकास गव्हाणे, नंदू गव्हाणे, मच्छिंद्र (आण्णा) डफळ, जयेश गव्हाणे, रोहिदास खोंडे, खाचणे यांच्यासह अनेक नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 7 (सँन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी) मधील अ प्रवर्गातून विराज विश्वनाथ लांडे, ब प्रवर्गातून अनुराधा सुशिल लांडगे, क प्रवर्गातून अश्विनी निलेश फुगे आणि ड प्रवर्गातून अमोल मधुकर डोळस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
मॉर्निंग वॉक दरम्यान माजी आमदार विलास लांडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबत चर्चा केली. जायका चहा कट्टा येथे थांबून त्यांनी सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या. यावेळी येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि काम करणारे प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त करत विलास लांडे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
प्रचाराच्या रणधुमाळीत विलास लांडे यांनी घेतलेला हा पुढाकार प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरत आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.


