बलदेवनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर, इंदिरानगरमध्ये राष्ट्रवादी पॅनेलची जोरदार प्रचारफेरी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 21 मधील झोपडपट्टी भागासह सर्व परिसरातील विकास कामांना प्राधान्य देत त्यांना गती दिली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी केले. येत्या महापालिका निवडणुकीत संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व स्वतः निकिता कदम यांच्या चार सदस्यीय राष्ट्रवादी पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बलदेवनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर व इंदिरानगर परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेविका निकिता कदम यांनी गेल्या पाच वर्षांत सहकारी नगरसेवक संदीप वाघेरे व डब्बू आसवानी यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. सुभेदार आंबेडकर वसाहत मिलिंदनगर कमान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, छत्रपती शाहू महाराज हौसिंग सोसायटी अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून 222 सदनिकांचे वाटप, त्रिलोक्य स्मशानभूमीचे सुशोभिकरण, जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण, तसेच सर्व झोपडपट्टी भागात भूमिगत विद्युत केबल, काँक्रिट रस्ते आदी कामे पूर्ण केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
या प्रचारफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्यासह पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे, कल्पना घाडगे, ज्योती साठे, अनिता मोईकर, सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी, रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी, अजय गुप्ता, नीरज चावला आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता निश्चित आहे. महापौरदेखील राष्ट्रवादीचाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


