स्व.आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात झालेली भरीव विकासकामे, स्पष्ट धोरणे आणि प्रभाग क्रमांक ३२ सह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यासाठीचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडला जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांतील प्रगतीची ठोस उदाहरणे देत भाजप उमेदवार मतदारांचा विश्वास अधिक दृढ करत आहेत.
माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे आणि माजी नगरसेवक संतोष कांबळे यांच्या सौभाग्यवती तृप्ती संतोष कांबळे हे चारही उमेदवार विकासाचे मुद्दे आणि भविष्यातील विकासाचा सुस्पष्ट आराखडा घेऊन घरोघरी पोहोचत आहेत. त्यांच्या प्रचाराला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभागात भाजपच्या कार्यशैलीबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.
एकंदरीतच प्रभाग क्रमांक ३२ मध्ये पुन्हा एकदा भाजप आपली सत्ता कायम राखेल आणि विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेईल, असे चित्र सध्या स्पष्टपणे निर्माण झाले असून निवडणुकीच्या रंगात भाजपची आघाडी ठळक होताना दिसत आहे.


