spot_img
spot_img
spot_img

अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रभाग ३१ च्या कार्य अहवालाचे प्रकाशन

वीज, पाणीपुरवठा, अभ्यासिका, क्रीडा संकुल या सुविधा देण्यास बांधील

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी सांगवी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजय संकल्प सभेत नवी सांगवी – प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा कार्यअहवाल प्रकाशित करण्यात आला.
या कार्यअहवालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली विविध विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सोयीसुविधांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला आहे. यावेळी प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार राजेंद्र गणपत जगताप, अरुण श्रीपती पवार, उमा शिवाजी पाडुळे, दिप्ती अंबरनाथ कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भरीव काम केल्याचे सांगितले. “महापालिकेच्या माध्यमातून शहरात पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या असून, नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी विकासकामांना गती देण्यात आली आहे. हीच विकासाची घडी पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उमेदवारांनी देखील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. वीज पुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा यांसारख्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे आश्वासन दिले.
सभेच्या शेवटी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना करण्यात आले.

कार्य अहवालात समाविष्ट बाबी :
‘या’ गोष्टी करणार :
* नवी सांगवीचा वीज पुरवठा सुधारणार
* नवी सांगवीचा पाणीपुरवठा नियमित करणार
* स्वच्छ, सुंदर नवी सांगवीचा निर्धार
* खेळाडू घडविण्यासाठी सुसज्ज क्रीडासंकुल उभारणार
* नवी सांगवीत २०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
* स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सो नीयुक्त अभ्यासिका उभारणार

पूर्ण केलेली विकासकामे :
* सुसज्ज नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,
* राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर गार्डन) नूतनीकरण,
* २० दशलक्ष लिटर पाण्याची टाकी बांधली.
* गल्ली बोळातील सिमेंट रस्ते केले.
* पाण्याच्या जुन्या पाईप लाईन काढून त्या ठिकाणी नवीन पाईप लाईन
* कोरोना काळात २४ तास उपलब्ध राहून लोकांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, बेड मिळवून दिले.
* कोरोना काळात नागरिकांना गावाला जाण्यासाठी पासची, अॅम्ब्युलन्सची व प्रवासाची व्यवस्था, अन्नधान्य घरपोच
* हुशार व गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश, शैक्षणिक मदत
* सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातील पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे आणि गरजू वस्तूंचा पुरवठा
* भाजी व फळे विक्रेत्यांना साई चौकात जागा उपलब्ध करुन तिथे भाजी मंडई स्थापन करुन दिली.
* सोसायट्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा समस्या, वीजेची समस्या सोडवली.
* युवक-युवतींना रोजगार मार्गदर्शन आणि महिला बचत गटांना सक्रिय मदत.
* मराठवाडा भवन व वसतिगृहासाठी पिंपळे गुरवमधील कोट्यवधी रुपये किंमतीची १० गुंठे जागा दान केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!