आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
शबनम न्यूज:प्रतिनिधी
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 मध्ये भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आज गुरुवार, दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे.
या सभेला आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत येणाऱ्या पिंपरीगाव, वैभव नगर, मिलिंद नगर आणि निगडीत भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रभागातील भाजपा आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार उषाताई संजोग वाघेरे, मोनीकाताई सुरेश निकाळजे, गणेश रामराव ढाकणे, आणि नरेश पंजाबी निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाच्या चारी उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. या उमेदवारांच्या विजयाचा शंखनाद करणारी आजची सभा ठरणार आहे. भाजपकडून विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात असून मतदारांचा भरघोस पाठिंबा चारही उमेदवारांना मिळत आहे.


