शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपच्या पॅनेलला प्रभागातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे प्रभागातील राजकीय वातावरणात भाजपला बळ मिळाले असून ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कस्पटे वस्ती, श्री गुरुदेव, पार्कस्ट्रीट व वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ आदी प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघांचा समावेश आहे.
कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनंतर सरातील विविध ज्येष्ठ संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील उमेदवार ऍड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे व संदीप कस्पटे यांना सर्वानुमते पाठिंबा जाहीर करण्यात आला. हा निर्णय संघातर्फे अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. सभेत बोलताना ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या अकरा वर्षांत संघाच्या जडणघडणीत संदीप कस्पटे यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला.
ज्येष्ठ नागरिक संघांचा हा एकमुखी पाठिंबा म्हणजे केवळ राजकीय समर्थन नसून, प्रभागातील विकासकामांबाबत, सामाजिक बांधिलकीबाबत आणि विश्वासार्ह नेतृत्वाबाबतची सकारात्मक साक्ष असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजप पॅनेलची ताकद या पाठिंब्यामुळे अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.
आमच्या विविध संघांच्या सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांना ह्या आताच्या उमेदवार असलेल्या समाजसेवकांनी वेळोवेळी पाठबळ दिले त्यामुळेच आमचे सर्व संघ शहरातील मोठे, आदर्श व नावारूपास आलेले ज्येष्ठ नागरिक संघ ठरले आहेत. या सर्वांनी दिलेल्या सहकार्याच्या योगदानातून आमचे संघ उतराई झाल्याशिवाय राहणार नाही,” असा आमचा ठाम निर्धार असून आमचे सदैव आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांच्यासोबत असेल.
– विठ्ठलराव अन्नदाते
कार्यकारी सदस्य कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघ, वाकड


