जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून विजयाचा विश्वास अधिक बळावला
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील नियोरेगल सोसायटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा झंझावाती प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रचारादरम्यान माय-बाप जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजयाचा विश्वास अधिकच दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रचार फेरीदरम्यान “परिवर्तनाचा नारा – राष्ट्रवादीचा वारा”, “काम करणाऱ्यालाच संधी द्या”, “घड्याळाला मत – विकासाला मत” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिला.
जनतेने दाखवलेल्या या जनशक्तीच्या प्रेमामुळे प्रभागात परिवर्तनाचा मार्ग मोकळा झाला असून, विकासाची नवी पहाट निश्चितच उगवणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला. घरोघरी जाऊन थेट जनसंवाद साधताना उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि मूलभूत प्रश्न जाणून घेतले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व दलित घटकांचे सक्षमीकरण तसेच युवकांसाठी संधी निर्माण करणे हा प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला.

या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना जनतेकडून विशेष पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील विविध प्रवर्गांचे प्रतिनिधित्व करणारे हे उमेदवार विकासासाठी कटिबद्ध असून, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे —
🔹 अ.क्र. 7 – सीमा रवींद्र सावळे
(प्रभाग क्रं. 8 (अ) – अनुसूचित जाती)
🔹 अ.क्र. 1 – राजश्री अरविंद गागरे
(प्रभाग क्रं. 8 (ब) – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला)
🔹 अ.क्र. 5 – अश्विनी संजय वाबळे
(प्रभाग क्रं. 8 (क) – सर्वसाधारण महिला)
🔹 अ.क्र. 4 – तुषार भिवाजी सहाणे
(प्रभाग क्रं. 8 (ड) – सर्वसाधारण पुरुष)
येत्या निवडणुकीत आपल्या हक्काच्या माणसाला साथ देण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एकूणच नियोरेगल सोसायटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक 8 मध्ये परिवर्तनाची चाहूल लागली असून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या रणांगणात आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


