गवळी नगरात प्रचार शिगेला; विश्वास आणि प्रगतीचा जनादेश ठाम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, त्यांचा प्रचार आता शिगेला पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः गवळी नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला मतदारांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचार रॅलीदरम्यान “विश्वास आणि प्रगतीचा संदेश – प्रियांका ताई बारसे यांना जनादेश”, “काम करणाऱ्या नेतृत्वाला पुन्हा संधी द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. जागोजागी महिलांनी औक्षण करून, तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देत प्रियांका ताई बारसे यांचे मनापासून स्वागत केले. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे प्रचार रॅलीला वेगळीच ऊर्जा मिळाली.

घरोघरी जाऊन थेट जनसंवाद साधताना प्रियांकाताई बारसे यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि महिला-युवकांसाठीच्या योजनांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. मागील कार्यकाळात राबवलेल्या विकासकामांचा आढावा देत पुढील काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना, युवकांना रोजगाराभिमुख संधी, सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कावर मतदारांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून प्रियांकाताई बारसे या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या, उपलब्ध आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखल्या जात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील मतदार यंदाच्या निवडणुकीत निश्चितच प्रियांकाताई बारसे यांना प्रतिनिधित्वाची संधी देतील, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रियांकाताई बारसे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, जनतेचा कौल त्यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


