शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर परिसरात भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली. या संवादातून त्यांच्या कायमस्वरूपी बांधिलकीचे आणि जनतेशी जपलेल्या नात्याचे स्पष्ट दर्शन घडत आहे.
नागरिकांच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होत, विकासकामांसाठी पाठपुरावा करणाऱ्या अनिताताई काटे यांनी यावेळी परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, उद्यान व सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. प्रत्येक प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना अनिताताई काटे म्हणाल्या की, “निवडणूक ही केवळ मत मागण्यासाठी नसून, नागरिकांशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ करण्याची ही संधी आहे. मागील काळात जे विकासकामे केली, ती जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाली. पुढील काळातही पिंपळे सौदागरचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

स्थानिक नागरिकांनीही अनिताताई काटे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत, त्या नेहमी उपलब्ध असणाऱ्या, प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी असल्याचे मत व्यक्त केले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला.
या संवादातून केवळ प्रचार नव्हे तर जनतेशी जपलेली नाळ, विश्वासाचे नाते आणि विकासाची ठोस दृष्टी पुन्हा एकदा अनुभवास आली असून, प्रभाग २८ मध्ये निवडणुकीचा प्रचार अधिक वेग घेत असल्याचे चित्र दिसत आहे.


