spot_img
spot_img
spot_img

विकासाचा पंचवार्षिक लेखाजोखा जनतेसमोर : माजी नगरसेविका सौ. मीनलताई यादव यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशित

शबनम न्यूज:प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सौ. मीनलताई विशाल यादव यांच्या गेल्या पंचवार्षिक कार्यकाळातील विकासकामांचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ अहवाल आज भव्य कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या विकास अहवालाचे प्रकाशन झाले.

 

या वेळी माजी नगरसेवक तुषार हिंगे, आयुष निंबाळकर, कमलेश मुथा, कैलाजी कुटे, प्रसाद शंकर शेट्टी आणि अमितजी बाबर यांची उपस्थिती लाभली होती. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

या विकास अहवालामध्ये सौ. मीनलताई यादव यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध योजनांचा आणि प्रत्यक्षात झालेल्या कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. प्रभागातील विद्युत व्यवस्था सुधारणा, ड्रेनेज लाईनचे सुसूत्रीकरण, डांबरी व काँक्रीट रस्त्यांची उभारणी, नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली दीपमाळ, परिसराचे सौंदर्य वाढवणारे गाय–वासरू शिल्प, तसेच सार्वजनिक ठिकाणांचा विकास या कामांचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.

याशिवाय पंतप्रधान आवास योजना अंतर्गत गरजू नागरिकांना घरे मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, शाळांचे नूतनीकरण, शैक्षणिक वातावरण अधिक दर्जेदार करण्यासाठी उभारलेली अक्षरबाग, तसेच स्वच्छता व साफसफाईसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे प्रभागातील जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

या प्रसंगी आमदार शंकर जगताप यांनी, “सौ. मीनलताई यादव यांनी आपल्या कार्यकाळात विकासाला प्राधान्य देत नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरणारे काम केले आहे. हा विकास अहवाल म्हणजे केवळ आकडेवारी नसून प्रत्यक्ष कामांची साक्ष आहे,” असे प्रतिपादन केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेला हा विकास अहवाल नागरिकांसमोर पारदर्शक कारभाराचे चित्र मांडत असून, माजी नगरसेविका सौ. मीनलताई यादव यांच्या कार्याची ठोस ओळख म्हणून पाहिला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!