शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांची थेरगाव येथील ड्रायव्हर कॉलनीमधील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर परिसरात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस भाजपच्या उमेदवार मनीषा प्रमोद पवार, अभिषेक बारणे, तानाजी बारणे आणि सोनाली संदीप गाडे हे उपस्थित होते.
या बैठकीला परिसरातील मोठ्या संख्येने महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक व स्थानिक मतदारांनी उपस्थिती लावली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट जनतेशी संवाद साधत उमेदवारांनी आपली भूमिका मांडली तसेच मागील काळात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

बैठकीदरम्यान नागरिकांनी प्रभागातील विविध समस्या उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिल्या. यामध्ये
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था व डांबरीकरणाची गरज, पिण्याच्या पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठा, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा निचरा, कचरा संकलन व स्वच्छतेची व्यवस्था, महिलांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न, स्ट्रीट लाईट्स व सीसीटीव्हीची आवश्यकता, उद्यान, खेळाची मैदाने व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, आरोग्य सेवा व नागरी सुविधा बळकट करण्याची मागणी, असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.
यावेळी प्रमोद पवार, विनोद पवार, दिगंबर पवार, संदीप गाडे, आकाश शेलार, सुजित कांबळे, सुजित शिंदे, सनी पारखे , प्रेम पवार, रवी आरेकर, अनिल सुर्यवंशी, नितीन देवकाते, रोहित शिवशरण, आकाश गायकवाड, संभाजी अडसूळ, आदित्य देवराम, कुणाल सोनवणे, प्रज्वल साबळे, शाम केदारी, मलंग शेख, चैतन सुर्यवंशी, विजयराव गाडे, शिर्शेल कांबळे, विनय कांबळे, मंजुनाथ कांबळे, जावेद शेख, लक्ष्मण रॉय ,योगेश खताळ, रवी लोंढे, सुजाता पवार, कांता यादव, मंजूता गुप्ता ,राधा देवी, बेबीजलो ,भारती हुलगे , सुरेखा कुचेकर ,स्वाती खुसपे, सुमन प्रजापती, शोभा पानसरे, संध्या तेली , श्रद्धा मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, “प्रभागाचा सर्वांगीण आणि संतुलित विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा आमचा संकल्प आहे.” महिलांसाठी विशेष योजना, स्वच्छ व सुरक्षित परिसर, तसेच तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबवण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
बैठकीदरम्यान नागरिकांनी भाजप उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली. स्थानिक प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
एकूणच थेरगाव येथील ड्रायव्हर कॉलनीतील ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून, प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


