spot_img
spot_img
spot_img

प्रभाग २४ मध्ये मोठा उलटफेर; भाजप–शिंदे गटाच्या पाच उमेदवारांचे एबी फॉर्म बाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मध्ये अनपेक्षित राजकीय उलटफेर घडला असून भाजपचे तीन आणि शिवसेना (शिंदे गट) चे दोन उमेदवार यांचे एबी फॉर्म छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित पाचही उमेदवारांना आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे. यामध्ये
भाजपचे सिद्धेश्वर बारणे, गणेश गुजर, करिष्मा बारणे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

हा प्रभाग शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघात येत असल्याने, युतीतील दोन्ही पक्षांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर एबी फॉर्म दाखल करण्यात आले होते. यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून छाननी करण्यात आली आणि त्यात हे फॉर्म नियमबाह्य ठरवत बाद करण्यात आले.

या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये आता कमळ या चिन्हावरून केवळ एकच उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहे. उर्वरित उमेदवारांना अपक्ष म्हणून प्रचार करावा लागणार असल्याने त्यांच्या निवडणूक रणनीतीत मोठा बदल करावा लागणार आहे. चिन्ह बदलल्यामुळे मतदारांपर्यंत नवीन चिन्ह पोहोचवणे, प्रचार साहित्य बदलणे आणि स्वतंत्र यंत्रणा उभी करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, पिंपरी–चिंचवड महापालिकेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर असताना, प्रभाग २४ मधील या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि तांत्रिक कारणांमुळे झालेले नुकसान निवडणूक निकालांवर कितपत परिणाम करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!