शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत, प्रभाग क्रमांक १० मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना कष्टकरी जनता आघाडीने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या संदर्भात कष्टकरी जनता आघाडीचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. या पत्रामध्ये प्रभाग क्रमांक १० मधील भाजपचे अधिकृत उमेदवार उमेदवार, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे आणि कुशाग्र कदम यांना कष्टकरी जनता आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, प्रभागातील सर्व संघटित व असंघटित कष्टकरी बांधवांना आणि आघाडीच्या सदस्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या पूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे.
प्रभाग भाग क्रमांक १० मोरवाडी, लाल टोपी नगर, संभाजीनगर, शाहूनगर, दत्तनगर विद्यानगर, इंदिरानगर, परशुराम नगर, शंकर नगर, अण्णासाहेब नगर या भागात मोठ्याप्रमाणात कष्टकरी, असंघटित कामगार वर्ग असून त्यांच्या न्याय हक्कासाठी डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या या संघटनेच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना मोठी ताकद मिळणार आहे.


