spot_img
spot_img
spot_img

रहाटणी- पिंपळे सौदागरमधून शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात भाजपा सक्षम पॅनेल!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर रहाटणी–पिंपळे सौदागर प्रभाग क्र. 28 मधून भारतीय जनता पार्टीने शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्त्वाखाली एक सक्षम व अनुभवी पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ‘मिशन-PCMC’ अंतर्गत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यांवर ही निवडणूक लढविण्याचा निर्धार पॅनेलने व्यक्त केला आहे.

भाजपाच्या अधिकृत पॅनेलमध्ये (अ) शत्रुघ्न (बापू) काटे, (ब)  अनिता काटे, (क)  कुंदा भिसे आणि (ड)  संदेश काटे यांचा समावेश आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपा सत्ताकाळात झालेले लोकहिताचे निर्णय आणि महापालिका सत्ताकाळातील विकासकामे लोकांसमोर ठेवून उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना शत्रुघ्न काटे यांनी प्रभागवासीयांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “अनुभव, प्रामाणिक कामकाज आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ या बळावर आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. ही केवळ निवडणूक नसून जनतेसोबत निर्माण झालेल्या ठाम विश्वासाची लढाई आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासावर भर देत भाजपाचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला न्याय देत, पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करण्याचे आमचे ठाम वचन आहे. जनतेच्या सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधत, रहाटणी–पिंपळे सौदागरला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करू. शेवटच्या घटकाचा विकास हाच संकल्प आहे.
– शत्रुघ्न काटे, उमेदवार, शहराध्यक्ष, भाजपा, प्रभाग- 28.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!