- शालेय शिक्षण विभागाची मान्यता
शबनम न्यूज | पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास अखेर शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा टप्प्याटप्प्याने लागू होणार त्यानुसार अभ्यासक्रमात बदल त्यानुसार नवीन पाठ्यपुस्तके येतील मूल्यमापनाची पद्धत बदलेल याबाबत चर्चा होत होती, हा आराखडा शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून लागू होणारे हे देखील निश्चित होते. परंतु, त्याबाबत अद्याप अध्यादेश निघाला नसल्याने अंमलबजावणीच्या टप्प्यातील अनेक कामे रखडली होती. या कामांना अखेर गती मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आणि नव्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार आता राज्यात यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण या स्तराएवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात येतील नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 -26 पासून टप्प्याटप्प्याने होणार आहे.