शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर कोकणे यांनी आपल्या प्रचारातून वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे. “चला ठरवूया, प्रभाग क्रमांक २७ चे चित्र बदलूया” असा नारा आता थेट मतदारांच्या वतीने दिला जात असून, या घोषणेमुळे संपूर्ण प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत सागर कोकणे हे निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. समोर विरोधात कोणीही असले तरी मतदार आपल्या विकसनशील, तरुण आणि कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्यालाच भरघोस मतांनी विजयी करतील, असा ठाम आत्मविश्वास सागर कोकणे यांनी व्यक्त केला आहे.

प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांचा मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. नागरिक आपल्या भागातील मूलभूत समस्या, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य व युवकांसाठी संधी यासंदर्भात आपल्या अपेक्षा मांडत आहेत. त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन सागर कोकणे देत आहेत.
आज त्यांनी मथुरा कॉलनी तसेच १–२ कृष्णाई कॉलनी परिसरात प्रत्यक्ष गाठीभेटी घेत मतदारांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. त्या प्रश्नांची नोंद घेत लवकरात लवकर मार्गी लावण्याचा निर्धार सागर कोकणे यांनी व्यक्त केला. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या आणि कामावर विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्वशैलीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे.
तरुण नेतृत्व, स्पष्ट विकासदृष्टी आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे सागर कोकणे यांची उमेदवारी अधिक बळकट होताना दिसत आहे. “प्रभागाचा चेहरा बदलायचा असेल, तर नवा विचार आणि काम करणारे नेतृत्व आवश्यक आहे,” अशी भावना व्यक्त करत मतदार मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर कोकणे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत ते एक मजबूत दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.


