शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ५ मधून उमेदवारीच्या शर्यतीत असलेल्या प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रभागातील विविध भागांत त्या प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत असून आज त्यांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी स्नेहपूर्ण भेटी घेतल्या.
या भेटीदरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रियांका ताई बारसे यांना आशीर्वाद देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. सामाजिक कार्य, जनहिताचे उपक्रम तसेच प्रभागाच्या विकासासाठी असलेली त्यांची सकारात्मक भूमिका यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रियांका ताई बारसे यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम याबाबत आपले स्पष्ट व्हिजन ज्येष्ठ नागरिकांसमोर मांडले. “अनुभव आणि नव्या विचारांची सांगड घालून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रचारादरम्यान प्रभागातील महिला मोठ्या संख्येने त्यांच्या समवेत दिसून आल्या. महिलांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रियांका ताई बारसे यांना भरभरून पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला सक्षमीकरण, बचतगटांना प्रोत्साहन, आरोग्य व सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रियांका ताई प्रवीण बारसे यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, निवडणुकीच्या रणांगणात त्या एक सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



