शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज विहीत वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण १ हजार ७६ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे.
आज (२६ डिसेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभागनिहाय वितरित करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या –
अ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे २६, ४०, ३८ व २३ असे एकूण १२७ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ६५, २३, १६ व ३१ असे एकूण १३५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे १४, १३, ४७ व ४० असे एकूण ११४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ५२, १७, २३ व ५७ असे एकूण १४९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ३०, ४५, ४५ व ३३ असे एकूण १५३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे १६, ६७, २५ व ३७ असे एकूण १४५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे ३९, ३०, १४ व २४ असे एकूण १०७ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ह क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २०, ३०, ३१, ३२ साठी अनुक्रमे ४२, ४६, ३८ व २० असे एकूण १४६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.


