spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये सुरेश भोईर यांचे दणदणीत शक्तीप्रदर्शन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी चांगलीच तापू लागली असून, भाजपचे प्रभाग क्रमांक १८ मधील ताकदवान नेतृत्व सुरेश भोईर यांनी केलेल्या भव्य शक्तीप्रदर्शनामुळे चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जनतेच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हे शक्तीप्रदर्शन केवळ रॅली न राहता मोठ्या जनसमर्थनाचे दर्शन घडवणारे ठरले.

सन २०१७ मध्ये सर्वाधिक मते मिळवत दणदणीत विजय संपादन करणारे सुरेश भोईर हे प्रभाग १८ मधील विकासाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. गेल्या नऊ वर्षांत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, मंदिरे, सभामंडप तसेच विविध नागरी सुविधांची प्रभावी कामे करत त्यांनी “काम बोलेल” हीच आपली राजकीय ओळख निर्माण केली आहे.

या शक्तीप्रदर्शनात तरुण, महिला, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भोईर यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांचा थेट जनतेशी असलेला संवाद यामुळे त्यांची लोकप्रियता शिखरावर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मजबूत पकड आणि सातत्यपूर्ण संपर्कामुळे भोईर यांचे स्थान चिंचवडच्या राजकारणात अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.

या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणातही हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक १८ मधून भोईर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली असून, चिंचवडगाव परिसरात भोईर यांची वाढती ताकद विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आगामी काळात चिंचवडचे राजकारण अधिक तापणार असून, निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाणार, हे मात्र निश्चित आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!