शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण विकासासाठी बापू दिनकर कातळे सज्ज झाले असून, त्यांनी निवडणूक रिंगणात उतरताच प्रचाराला सुरुवात केली आहे. मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत व गुरुद्वारा परिसरात त्यांचा प्रचार दौरा सुरू असून, नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रभागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे बापू दिनकर कातळे यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम व योजना राबवून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे.
त्यांच्या कार्यकाळात आधार कार्ड अभियानांतर्गत मोफत कार्ड वाटप, कोविड काळात मोफत साहित्य व मदत वितरण, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म भरणे, मुलींसाठी सुकन्या योजना, विधवा महिलांना सहाय्य मिळवून देणे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दिव्यांग बांधवांना चष्मे व आवश्यक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल व घड्याळ देऊन सन्मान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरटीआय फॉर्म वाटप, आयुष्यमान कार्ड वाटप तसेच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत ध्वज वितरण असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पुढील काळात प्रभागाच्या विकासासाठी अधिक व्यापक व दीर्घकालीन योजना राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. “विकासाचा नवा अध्याय” या संकल्पनेअंतर्गत सुमारे ५ हजार महिलांसाठी मोफत ॲडव्हान्स प्रशिक्षण वर्ग, भव्य गार्डन व विरंगुळा केंद्र, सुसज्ज उद्याने, प्रशस्त हॉस्पिटल, सार्वजनिक शौचालये, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, रुंद व दर्जेदार रस्ते, हॉकर्स झोन, ग्रंथालय, खेळाची मैदाने, महिलांसाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य, तसेच मेट्रो सिटी गार्डन पुन्हा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे बापू दिनकर कातळे यांनी सांगितले.
प्रभागातील विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सामाजिक उन्नती यांना प्राधान्य देत पुढील काळात अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, त्यांना मिळणारा वाढता जनसमर्थन हा विश्वास अधिक दृढ करत असल्याचे चित्र सध्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये दिसून येत आहे.


