spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका निवडणुकीसाठी आज एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने आज दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक १७ (ड) साठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची व अर्ज स्वीकृती प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) ८७५ इच्छुक उमेदवारांनी २ हजार २१२ अर्ज नेले होते.  पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही.
तर आज (२४ डिसेंबर ) रोजी प्रभाग क्रमांक १७- ड साठी एक अर्ज दाखल केला असून गेल्या दोन दिवसात एकूण दाखल झालेल्या अर्जांची संख्या १ एवढी आहे.सचिन बाजीराव चिंचवडे (पक्ष – भारतीय जनता पक्ष)  असे उमेदवाराचे नाव आहे.  

उद्या दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अर्जाची स्वीकृती बंद राहणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!