‘विकासासाठी एकच नाव’ अशी मतदारांची ठाम भूमिका
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये विकासाची दूरदृष्टी असलेले आणि जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचार दौऱ्याला जोरदार सुरुवात झाली असून, या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढता जनसमर्थनाचा ओघ पाहता प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
प्रचारादरम्यान भाऊसाहेब भोईर हे केवळ मतांची मागणी न करता नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत, हे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात ठोस आणि वेळबद्ध नियोजन राबविले जाईल, असा विश्वास नागरिकांना दिला आहे.
भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखालील मागील कार्यकाळातील विकासकामांचा ठसा आजही प्रभागात दिसून येतो. त्यामुळेच “काम करणारा नेता पुन्हा हवा” अशी ठाम भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विरोधकांकडून केवळ टीकेचे राजकारण सुरू असताना, भाऊसाहेब भोईर यांनी मात्र विकासाचे राजकारण पुढे ठेवत प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीचा अजेंडा मांडला आहे.

प्रभागात भाऊसाहेब भोईर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचारात स्पष्टपणे जाणवत आहे. “प्रभाग क्रमांक १७ च्या विकासासाठी एकच नाव — भाऊसाहेब भोईर,” अशा प्रतिक्रिया मतदारांकडून सातत्याने व्यक्त होत आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाऊसाहेब भोईर यांच्यासारखे विकासाभिमुख, अनुभवसंपन्न आणि जनतेशी थेट नातं असलेले नेतृत्व पुन्हा एकदा संधीस पात्र असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत असून, प्रभाग १७ मध्ये त्यांची वाटचाल निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे.


