spot_img
spot_img
spot_img

महापालिका निवडणूक: प्रभाग क्र. २८ मध्ये भाजपची संघटनात्मक तयारी वेगात

अनिताताई संदीप काटे प्रबळ दावेदार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर–रहाटणी) येथील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन व संवाद बैठक पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. ही बैठक चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अनिता ताई संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांचीही उपस्थिती लाभली. या प्रभाग क्र. २८ मधून अनिताताई संदीप काटे या प्रबळ दावेदार ठरल्या आहेत. 

बैठकीदरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावीपणे राबवणे, मतदारांशी थेट व सातत्यपूर्ण संवाद साधणे, प्रभागातील स्थानिक प्रश्नांची परिणामकारक मांडणी करणे तसेच पक्षाच्या धोरणांचा आणि विकासात्मक विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच तरुण, महिला व नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. डिजिटल माध्यमांचा व सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून विकासकामे व पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यावरही चर्चा झाली. तसेच रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व पायाभूत सुविधा यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मुद्देसूद व सकारात्मक प्रचार करण्याचा सल्ला देण्यात आला.

या संवादात्मक बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी स्पष्ट दिशा व आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र दिसून आले. प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपने निवडणूक तयारीला वेग दिल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!